गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

दिवाळी शुभेच्छा

दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
 . . . . वसुबारसेला ।।१।।

दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
 . . . . धनत्रयोदशीला ।।२।।

दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
 . . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।

दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
 . . . . अश्विन आमावस्येला ।।४।।

दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
 . . . . बळीप्रतिपदेला
         (पाडव्याला)  ।।५।।

दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
 . . . . यमद्वितियेला
         (भाऊबीजेला) ।।६।।

सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची  आणि समृद्धीची जावो.
दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा ....🙏🙏💐🌹🌻🌹🌻🌻
*अनिल मोहिते*